क्राइम

फेसबुक वरील मैत्री पडली महागात

तरुणीने स्वतः कपडे काढत डॉक्टरला कपडे काढायला लावले आणि केले असे

 

 

 

सोशल मीडियावर मैत्री करणे पुढच्या व्यक्तीला प्रेमात ओढणे मग त्याला नेकेड व्हायला सांगणे. तो मानला नाही तर स्वतः नेकेड होऊन त्याला उत्तेजित करणे तो उत्तेजित झाला की त्याचे स्क्रीन रेकॉर्डिंग करणे आणि त्यानंतर त्याच्याकडे पैशाची मागणी करणे आणि त्याने मागणी उरण करण्यास नकार दिला की त्याला त्याचे नेकेड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करम्याची धमकी देणे. हा कमाईचा नवा फंडा सुरू झाला आहे. अनेक तरुण तरुणींच्या या जाळ्यात अडकून त्यांना पैशे देत आहेत. दिल्लीतील अध्ययनरत डॉक्टर सोबत असाच प्रकार घडला आहे. त्रासलेल्या या डॉक्टर ने पोलिसात धाव घेत आपबीती सांगितली आहे

 

दिल्लीतील यमुनापार येथील हा डॉक्टर एका प्रतिष्ठीत मेडीकल कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. त्यासाठी तो घरापासून दूर राहतो. मे महिन्यात फेसबुकवर एका तरुणीची फ्रेण्ड रिक्वेस्ट त्याला आली होती. अॅक्सेप्ट केल्यानंतर त्यांच्यात ओळख झाली आणि ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले. 12 मेला तरुणीने डॉक्टरकडे त्याचा व्हॉट्सअॅप नंबर मागितला आणि त्यानेही तो लगेच दिला.

 

13 मे रोजी तरुणीने अश्लील व्हिडीओ कॉल करण्यासाठी त्याच्यावर जोर टाकला होता मात्र त्याने नकार दिला. मात्र 14 मे रोजी तरुणीने व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉल केल्यानंतर ती न्यूड व्हायला लागली. त्यानंतर उत्तेजित होत डॉक्टरनेही अंगावरचे कपडे काढले. फोन झाल्यानंतर तरुणीने त्याला मेसेज करुन तुमचा न्यूड व्हिडीओ बनवल्याचे सांगितले. पैसे दिले नाहीत तर व्हिडीओ वायरल होईल अशी धमकी दिली. हे वाचून डॉक्टरच्या पायाखालची जमिनच सरकली.

 

डॉक्टरने तत्काळ त्या नंबरवर फोन लावला त्यावेळी एका तरुणाने फोन उचलला, फोन घेणाऱ्या व्यक्तीने एका बँकेचा खाते नंबर दिला आणि त्यावर 29 हजार रुपये जमा करायला सांगितले. पैसे जमा न केल्यास व्हिडीओ वायरल करण्याची त्याने धमकी दिली होती. भेदरलेल्या डॉक्टरने पैसे पाठवले. त्यानंतर गर्ल चार्जचा बहाणा करत 16800, व्हिडीओ डिलीट करण्यासाठी 26500, आणि अन्य धमक्या देत 29000 ट्रान्सफर करायला सांगितले. एकूण 81,300 रुपये सांगितलेल्या खात्यांमध्ये जमा केल्यानंतर या डॉक्टरला सोशल मीडिया चार्जसाठी पुन्हा 37,500 रुपये मागण्यात आले. यावेळी मात्र डॉक्टरने पैसे देण्यास नकार दिला. डॉक्टरला धमकावणाऱ्या तरुणाने डॉक्टरचा नग्न व्हिडीओ फेसबुक आणि युट्युबवर व्हिडीओ अपलोड करत असल्याचे स्क्रिनशॉट पाठवायला सुरुवात केली. डॉक्टरने या तरुणाचा नंबर ब्लॉक केला तर या तरुणाने दुसऱ्या नंबरवरून डॉक्टरला धमकवायला सुरुवात केली. अखेर हिंमत एकवटून डॉक्टरने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

 

 

 

Happy Birthday


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे.
Close
Close